अहेरी गावाची आदर्श गावाकडे वाटचाल....

Bhairav Diwase
माझे गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून गावाला आदर्श गाव करण्याचा निर्धार


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दिनांक 19 मे 2021 ला सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य च्या वतीने मा. बाबासाहेब पावसे पाटील, राज्य सरचिटणीस यांचे नेतृत्वात गावसहभगी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दर महिन्याला एकदा गाव स्वच्छ करण्याचा निर्धार महिलांनी केला असून गाव हागणदारी मुक्त, व्यसन मुक्त, शिक्षण व आरोग्य, वृक्ष लागवड करणे, गावाचे सौंदर्यीकरण, गाव स्वच्छता आणि जेविक शेती इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. 
सोशल डिस्तांसिंनग ठेऊन कार्यक्रमाला मा. मोरेश्वर शेरकी, उपसरपंच, ग्रा. प. अहेरी, मा. गंगाधर खाडे, सुभाष उपरे, सदानंद बोबडे, पंकज मारोती उपरे, संदीप जुलमे, मा. जगदीश पाचभाई , राज्य समन्वयक, सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य , मा. बि. एन. टिपले, सौ. माया चांदेकर, संगीता उपरे, सचिव, उषा सोयाम, सौ. प्रतिभा शेरकी, सौ वंदना डाखरे, सौ. मीना विद्ये, सौ. प्रतिभा डाखरे, सौ. लीलाबाई ईसणकार, सौ. रेखा कुळमेथे, सौ. नंदा बोबडे, ज्योत्स्ना जुलमे, सौ. प्रेमीला देवगडे , सौ. अश्विनी उपरे, शशिकला उपरे, सौ. शिला उपरे , जयश्री पावडे, प्रकलप समनयक आणि बचत गटाच्या महिलानी सहभाग घेतला असून माझे गाव माझी जबाबदारी नुसार अहेरी गाव आदर्श करण्याचा निर्धार व्यक्त केला.