💻

💻

सावली व सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन व व्हेंटीलेटर मशीनचा पुरवठा करा.

सावली भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सावली:- सध्या कोरोनाचा उद्रेक दिवसेदिवस वाढत असल्यामुळे याचा परिणाम सामान्य जनतेवर होत आहे. सावली व सिंदेवाही तालुक्यात कोरोना रुग्ण फार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोरोना रुगणाच्या मृत्यु होत आहे. त्यामुळे सावली, सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर उभारण्यात आले आहेेत. कोंविड सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमीक आरोग्य केद्रात ऑक्सीजन कान्सट्रेटर मशीन, व्हेंटिलेटर आणि MBBS वैघकीय अधिकारी नसल्याने रुग्णाचा योग्य उपचार होऊ शकत नाही. त्यामुळे गंभीर रुग्णांना चंद्रपुर किंवा नागपुर येथे हलवावे लागते. रुग्ण हलविण्यासाठी संपुर्ण सुविधायुक्त रुग्णवाहीका सुधा उपलब्ध नाहीत अशा ऐक नाही तर अनेक अडचणीचा सामना सावली, सिंदेवाही तालुक्यातील रुग्णांना करावा लागत आहे. वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर मध्ये ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन व व्हेंटीलेटर मशीन आणि संपुर्ण सोयीयुक्त रुग्णवाहीकांचा पुरवठा करावा.
तसेच तालुक्यात MBBS डॉक्टर नाहीत. त्यामुळे वैद्यकीय सेवा पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. म्हणून MBBS वैद्यकीय अधिकारी यांची पूर्तता तसेच ऑक्सिजन कान्सट्रेटर मशीन व व्हेटीलेटर मशीन रुग्णवाहीकेचा पुरवठा करावा अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष, तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर श्री अविनाश पाल यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. त्यावेळी खासदार अशोक नेते, मा. आमदार देवराव होळी, मा. आमदार कृष्णाजी गजबे, उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत