💻

💻

दोन दुचाकीची समोरासमोर धडक;१ ठार तर ४ जण गंभीर जखमी.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
सावली:- बोथली मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीची समोरासमोर धडक झालेल्या घटना घडली. या अपघातात एक जण ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.


एका दुचाकीवर तीन जण पांढरसराड वरुन सावली येत होते. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण बोथली मार्गाने जात होते. हा अपघात सावली-बोथली मार्गावरील चिंतलवार राईस मिलच्या वळणावर झाला. बजाज डिस्कवर कपंनीची MH 34 AQ9912 या दुचाकीने पांढरसराड वरुन उत्तम मारोती कन्नाके (वय ३५) सुषमा उत्तम कन्नाके (वय ३०) आणि मारोती गोविंदा कन्नाके (वय ६५) हे सावलीला रुग्णालयात येत असतांना सावली वरुन बोथलीला येणाऱ्या दुचाकी चालक कालीदास आबाजी घोडमारे (वय २३) आणि मागील बसलेला साथीदार बाळकृष्ण भजन चौधरी (वय ३५) यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने विरुध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने पाच जण गंभीरपणे जखमी झालेत.
या अपघाताची नागरिकांना माहीती होताच त्यांनी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होऊन पाचही अपघातग्रस्तांना सावली ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन चार गंभीर जखमींना गडचिरोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतू पांढरसराड येथील मारोती गोविंदा कन्नाके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर उत्तम मारोती कन्नाके यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. सावली पोलीस उपनिरीक्षक चिचघरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर बोधे, मेजर मडावी, पो. शि. चव्हाण पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत