श्र्वास पुन्हा घेण्यासाठी.....

Bhairav Diwase

असे कसे दिस आले, समजेना कुणा काही
लेकराच्या खांद्यावर, दम तोडताहे आई...

दम तोडताहे आई, बाप सैरभैर झाला
घर दार कोसळले, दिसे ठोकलेला ताला...

दिसे ठोकलेला ताला, नाही कोणी आसपास
कोणी विकत देईना, जगण्याला एक श्वास...

जगण्याला एक श्वास, त्याची लावताहे बोली
दीप मालवून गेले, नको वाजवू रे थाली...
नको वाजवू रे थाली, सारा बाजार मांडला
दोन घासाच्या भुकेला, जीव भीतीने कोंडला...

जीव भीतीने कोंडला, शव गिळताहे भूमी
नदी रक्ताने वाहीली, नाही आयुष्याला हमी...

नाही आयुष्याला हमी, थोडे सावरु स्वत:ला
नियमांना साथ देवू, लस घेवूया हाताला...

लस घेवूया हाताला, श्र्वास पुन्हा घेण्यासाठी
दिस जातील असेही, पुन्हा घेवू भेटीगाठी...

✍️ अविनाश पोईनकर
७३८५८६६०५८

••••••••••••••••••••••••••••••••••