सभापती सुनीलभाऊ उरकुडे यांच्या हस्ते सास्ती येथील लसीकरण उपकेंद्राचे उद्घाटन.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज 17 मे 2021 रोज सोमवारला सास्ती येथे कोविड लसीकरणाचे उद्घाटनप्रसंगी जि. प. सभापती सुनीलभाऊ उरकुडे यांनी सास्ती येथील कोविड लसीकरण सुरू करून सास्ती गावातील जनतेला मोठा दिलासा दिला.
गावातील सर्वच नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता कोविड लसीकरण करून घेण्याचे आवाहन सभापती सुनील उरकुडे यांनी याप्रसंगी केले व नागरिकांना कमी अंतरावर लसीकरण घेता येण्यासाठी या लसीकरणाची सोय उपलब्ध केल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्यासाठी आरोग्य प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे पालन करण्याची विनंती त्यांनी केली.
लसीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी सास्ती गावातील सरपंच रमेश पेटकर, उपसरपंच कुणाल कुडे, भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, भाजयुमो शाखा सास्ती अध्यक्ष अरुण लोहबडे, ग्रा. पं. सदस्य नरसिंग मादर व गावकरी उपस्थित होते.