आत्महत्याचे कारण मात्र गुलदस्त्यात.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- मुल पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नांदगाव येथील युवकाने आपल्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
सुत्रांच्या हवाल्याने नुसार मूल तालुक्यातील नांदगाव येथील युवक विशाल विजय चलाख हा आपल्याच घराच्या आड्याला दोर बांधून स्वतः गळफास लागून आपली जीवनयात्रा संपविली.
ही घटना आज दिनांक 17 मे रोजी घडली. सदर घटनेची माहिती पोलिस दूर क्षेत्रातील पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मूल येथे पाठविण्यात आला.
मृतकाच्या मागे पत्नी, एक छोटी मुलगी, आई-वडील भाऊ, असा परिवार आहे. विशालच्या मृत्यूमुळे त्याच्या पत्नीवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.
मृतक हा घरचा एकमेव कमावता व्यक्ती असल्यामुळे मृतकाच्या पश्चात कुटुंबावर उपासमारीच्या तोंडघशी पडावे लागणार आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ठावरे यांच्या मार्गदर्शनात तितरमारे, गायकवाड, जुमनाके हे करीत आहेत.