परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील मुधोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिका-यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे नुकतीच केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र मुधोली येथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डाॅ. दिनेश मेश्राम व डाॅ. राजू बोबडे यांची बदली झाल्याचे परिसरातील नागरिकांना कळले. मात्र नुकतेच मुधोली येथे कोविंड सेंटर सुरु झाले व संपुर्ण परीसरात संबंधित वैदयकीय अधिकारी चांगल्या प्रकारे सेवा बजावत आहेत. २४ तास परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी सदर वैद्यकीय अधिकारी तत्पर असतात. त्यामुळे ग्रा. पं. मुधोली, ग्रा. पं. भामडेळी, ग्रा. पं. कोंढेगाव, ग्रा. पं. टेकाडी, ग्रा. पं. काटवल यांच्या कडून संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची बदली रद्द करण्यात यावी. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच दिलेल्या निवेदनावर विचार करुन निर्णय घ्यावा अन्यथा परिसरातील नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल. त्याला शासन व प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती आमदार प्रतिभाताई धानोरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर, भद्रावतीचे तहसिलदार ,गटविकास अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदन सादर करताना मुधोलीचे सरपंच बंडुजी पाटील नन्नावरे, भामडेळीच्या सरपंच सुषमा जिवतोडे, कोंढेगावचे उपसरपंच रवी घोडमारे, टेकाडीच्या सरपंच सावसाकडे, काटवलचे सरपंच भिमराव सांगोळे, ग्रा. पं. मुधोलीचे सदस्य सोमेश्वर पेंदाम, हनुमान राणे,यशवंत गायकवाड,सुरेश दडमल, नाना गजभे उपस्थित होते.