माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मानले माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथे कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात विरुर येथील भाजपा पदाधिकारी यांनी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या कडे मागणी केली होती,त्या अनुषंगाने मागील हप्त्यात माजी आमदार अँड संजय धोटे यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या कडे लसीकरण केंद्र सुरू करण्यासंदर्भात केली होती,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीन दिवसांच्या आत ही मागणी पूर्ण करून दिली,त्याबद्दल माजी आमदार अँड संजय धोटे यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले,
तसेच विरुर स्टेशन येथील भाजपा पदाधिकारी यांची मागणी पूर्ण करून दिल्याबद्दल सर्व भाजपा पदाधिकारी यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार अँड संजय धोटे यांचे आभार मानले कोविड लसीकरण सुरू झाल्यामुळे विरुर तसेच परिसरातील नागरिकांची होणारी गौर सोय पूर्ण पणे दूर झाल्यामुळे येथील नागरिकांना यांचा नक्की लाभ होणार असून चिंचोली PAC येथे लसीकरण केंद्रावर न जाता आता विरुर स्टेशन येथेच लसीकरण उपलब्ध होणार आहे,काही दिवसासाठी दर रविवार ला लसीकरण होणार असून,त्यानंतर नेहमीत सुरू राहणार आहे.