नाम फाउंडेशन कडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- सूसा ता.वरोरा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला नाम फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदत देण्यात आली.जेष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर व मकरंद अनासपूरे यांच्या संकल्पनेतून आत्महत्याग्रस्त शेतकरी कूटूंबाला आधार देण्याचे अविरत काम नाम च्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून सुरू आहे.
वरोरा तालुका सूसा येथील अल्प भूदारक शेतकरी राजू जेऊरकर यांनी 24 जानेवारी 2021 रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मूलगा, मूलगी व बराच मोठा परिवार आहे. परिवाराला सानूग्रह राशीच्या स्वरूपात पंधरा हजार रूपयांचा धनादेश देऊन बळीराजाच्या कूटूंबाला मोठा आधार देण्यात आला. हि मदत नाम फाउंडेशनचे विदर्भ-खान्देश प्रमूख हरिष इथापे यांचे तसेच चंद्रपूर जिल्हा मार्गदर्शक संजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुटुंबाला सूपूर्द करण्यात आली. यावेळी नामचे अखिल विरूटकर, रामदासजी दहाळकर,किशोर जांभूळे,कांताराम वाघ,मयूर जेऊरकर उपस्थित होते