घुग्घुस वेकोली, एसीसी, न.प. च्या वतीने पाणी पुरवठा सुरु

Bhairav Diwase
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचा पुढाकार


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
घुग्घुस:- घुग्घुस हे औद्योगिक शहर असल्याने या शहराची लोकसंख्या पन्नास हजाराच्या जवळ पास आहे एकूण सहा वार्ड असून सध्या उन्हाळा सुरु असल्याने परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.
त्या अनुषंगाने ही समस्या लक्षात घेत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी घुग्घुस वेकोली व्यवस्थापन, एसीसी सिमेंट कंपनी व्यवस्थापन आणि घुग्घुस नप प्रशासनाशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पिण्याच्या पाण्याचे टँकर घुग्घुस वासियांसाठी उपलब्ध करून दिले. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते पाणी पुरवठ्याचा शुभारंभ करण्यात आला.
हे पाण्याचे टँकर घुग्घुस परिसरातील वार्डात नागरिकांना पाणी उपलब्ध करून देत आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिपचे माजी समाजकल्याण सभापती, नकोडा मारडा क्षेत्राचे जिप सदस्य ब्रिजभूषण पाझरे, घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे, सिनू इसारप, भाजपा नेते विनोद चौधरी, शंकर सिद्दाम, श्रीनिवास कोत्तूर व वेकोली सुरक्षा अधिकारी सुदर्शन बल्लेवार उपस्थित होते.