Top News

माणिकगड सिमेंट कंपनी च्या मृतक कामगारांच्या पत्नीवर आली उपासमारीची पाळी.

कामावर घेण्याची मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- माणिकगड सिमेंट कंपनी मध्ये बरेच वर्षे काम केलेल्या कामगारांचा कोरोना किंवा इतर आजाराने मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहेत, मृतक कामगारांच्या पत्नीने कामासाठी अर्ज केला असता कंपनी ने नोकरी दिली नाही, काहींना नोकरी दिली मात्र कोणतेही कारण न सांगता कामावरून काढून टाकण्यात आले त्या मुळे मृतक कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहेत, श्रीमती शारदा जिवंदास काटवले यांचे पती नियमित कामावर होते,त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीला कामावर घेतले नाहीत,त्या मुळे त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहेत, श्रीमती संगीता गणेश वैरागडे यांना कामावर घेऊन काढून टाकले,

श्रीमती किरण श्रीवास्तव यांना सुद्धा कामावर घेऊन काढून टाकल्याने त्यांच्या कुटुंबावर सुद्धा उपासमारीची वेळ आली आहेत, त्यांच्या वर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे, त्यांना त्यांच्या पतीचे निधन कोरोना मुळे झाले असून त्या च्या कडे आग्रा येथील लाईफ केअर हॉस्पिटल चे अनुभव प्रमाणपत्र आहेत, त्या परप्रांतीय नसून गडचांदूर येथील आधार कार्ड व मतदान ओळख पत्र आहेत, कोरोना टेस्ट झाल्या नंतरच कामावर घेतले होते, थुटरा येथील बी,डी, सिंग यांचे घर माणिकगड सिमेंट कंपनी ने किरायाने घेऊन तिथे बाहेरून येणाऱ्या कामगारांची कोरोना टेस्ट झाल्यानंतरच कामावर घेतले जाते,याबाबत ची माहिती नगर परिषद व तहसिलदार यांना देण्यात आली आहेत, आपणावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे व निराधार आहेत असे किरण श्रीवास्तव चे म्हणणे आहे,
कंपनी ने सहानुभूतीने विचार करून मृतक कामगारांच्या पत्नीला कामावर घ्यावे अशी कामावरून काढून टाकण्यात आलेल्या महिलांची मागणी आहे,

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने