जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

तोल गेल्याने पुलावरून पडून युवकाचा मृत्यू.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- विरुर स्टेशन येथून धानोरा मार्गे आर्वी कडे दुचाकीने जात असताना वर्धा नदीच्या पुलावर तोल गेल्याने पुलाचे पिल्लरला धडक देत पुलाखाली पडून अपघात झाल्याने परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आज 12:30 वाजताच्या दरम्यान घडली. मृतकाचे नाव जितेंद्र कानासे वय 21 वर्ष राहणार टिकरी, मध्यप्रदेश असे आहे

गोंडपिपरी येथे रस्ता कामावर मिक्सर आपरेटर म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र कानासे हा काही कामानिमित्त विरुर येथून धानोरा मार्गे गोंडपिपरी ला जात होता. दरम्यान धानोरा जवळील वर्धा नदी वरील पुलावरून जात असताना दुचाकीस्वाराचा तोल गेला आणि पुलाचे पिल्लरला धडक देत 40 फूट खोल नदीचे पात्रात पडला या अपघात त्याचा मृत्यू झाला

माहिती मिळताच विरुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कृष्णा तिवारी, उपनिरीक्षक सदानंद वडतकर, आणि पोलीस बंडू कुमरे, देवाजी टेकाम, स्वप्नील, आणि अशोक घटनास्थळी दाखल झाले असून शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत