Click Here...👇👇👇

जळावू लाकडांच्या अपुऱ्या साठ्यामुळे चीता जाळणाऱ्यांच्या वाढल्या चिंता.

Bhairav Diwase
लाकडांचा साठा उपलब्ध करून देण्याचे मुख्य वनसंरक्षकांना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले पत्र.

माजी नगरसेवक राकेश पुन यांनी केली होती मागणी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- कोरोनच्या महामारीत दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होत असल्याने समश्यान भूमीत प्रेत जाळण्यासाठी लाकडाचा तुटवडा भासत असल्याची चिंता जनक माहिती समोर आली, त्याची दखल येथील माजी नगरसेवक तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश पुण यांनी घेत सदर प्रकार माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली.संबंधीत बाब लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट मुख्य वण संरक्षकांना पत्र लिहून गोंडपिपरी स्मश्यान भूमीत जळावू लाकडांचा साठा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे कळविले.


महामारीच्या या दुसऱ्या लाटेत भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. झाडांवरचा पाला जसा झडून पडतो तसे लोक मृत्यू च्या दाळेत जात आहेत.स्मस्यान भूमीत चीता जाळायला जागा अपुरी पडू लागली इतकी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जळावू लाकडांचा साठा सुद्धा अपुरा पडत असल्याने चीता जाळायची कशी हा एक चिंतेचा विषय ठरत असताना राकेश पुण यांच्या कडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

सामाजिक दायित्व जोपासनारे राकेश पुन हे सतत जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. मागील टाळेबंधीत तथा कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी गरजूंना अन्न धान्याची सढळ हाताने आणि निस्वार्थपणे मदत केली.या लाटेत मृतांच्या संख्येत वाढ झाल्याने जळावू लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सदर चिंतेची बाब लक्षात घेऊन जळावू लाकडांचा साठा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी राकेश पुण यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना निदर्शनास आणून दिल्याचे आणि मुनगंटीवार यांनी वण अधिकाऱ्यांना केलेल्या पाठपुरव्याचे सर्व स्तरावर स्वागत होत आहे.