💻

💻

23 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. विठ्ठलवाडा येथील विणा दादाजी पिंपळशेंडेे (वय 23 वर्ष) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अंगावर विज पडून शिक्षक जागीच मृत्यू.

दिनांक 1 जून च्या रात्री घरचे सगळे जन झोपी गेले असतानाच तिने टोकाचे पाऊल उचलले आणि आपल्या खोलीमध्ये गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. दिवस उजाडला तरी आपली मुलगी का उठली नाही हे बघण्यासाठी तिची आई दार उघडण्यासाठी गेली असता आतून दार बंद होते. खिडकीतून डोकावून बघितले आपली मुलगी गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आहे हे लक्षात आल्यानंतर आरडाओरड करायला सुरुवात केली तेव्हा ही घटना उघडकीस आली.


घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस विभागाला कळविण्यात आले असता.घटनास्थळी पोलीस विभागाचे कर्मचारी हजर झाले. तिचा मृत्यदेह रुग्णवाहिकेत टाकून शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे नेण्यात आले आहे. पुढील तपास गोंडपीपरी पोलीस करीत आहेत. विना च्या अश्या अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत