अंगावर विज पडून शिक्षक जागीच मृत्यू.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- जीवनात केव्हा आणि कसा जीव गमवावा लागेल. हे कुणालाच माहिती नाही. अशीच घटना दि. 1 जुन 2021ला दुपारी 3:30 वाजे दरम्यान जोरात हवा सुटून विजांचा कडकडाट निर्माण झाला. आणि यातच एका शिक्षकाला जीव गमवावा लागला. मेंडकी येथील दुर्दैवी घटना घडली. संजय जयस्वाल (शिक्षक) यांच्या अंगावर विज पडून जागीच मृत्यू झाला.
ते महात्मा ज्योतीराव फुले विद्यालय मेंडकी येथे पेश्याने शिक्षक होते. वय 54 वर्ष होते. शेतात काम करत असतांना त्यांच्या अंगावर अचानक वीज पडली आणि ते जागीच ठार झाले. दुर्दैवी घटना घडल्याने परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा आप्त परिवार आहे.