Top News

25 लाखांचे विनापरवाना बिटी बियाणे जप्त.

कृषी व पोलिस विभागाची कारवाई.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
यवतमाळ:- जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेत आता मोठ्या प्रमाणात परवानगी नसलेले बियाणे येत आहे. अमरावती जिल्ह्यातून कळंब येथे जात असलेल्या 'बीटी' ची पाकीट कृषी विभागाने जप्त केले आहे. ही कारवाई यवतमाळ कळंब मार्गावर केली आहे.
एका कृझर मध्ये ही तस्करी होत होती. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. दमदार पाऊस झाल्यानंतर दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीची जवळपास सर्व तयारी केली आहे.
कृषी विभागाने शेतकर्‍यांची अडवणूक होऊ नये, म्हणून तयारी केली आहे. जिल्ह्यात यंदा साडेनऊ लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यातमध्ये सर्वाधिक ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जाणार आहे. २ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख ५० हजार हेक्टरवर तुरीची लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेरणीसाठी शेतकर्‍यांना आवश्यक असलेले बी- बियाणे, खतांचा साठा करणे, कृषी विभागाने सुरू केलेल आहे. शेतकर्‍यांना आवश्यक असलेले, बियाणे कृषी सेवा केंद्रापर्यंत पोहोचले जात आहे, असे असले तरी परवानगी नसलेले, बियाणेही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत. अमरावती वरुन 'बीटी' ची मोठी खेप येत होती.
कृषी विभागाने हा साठा जप्त केल आहे. यासंदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी अधिकारी सामान्य निलेश ढाकुलकर, राजेंद्र माळोदे, पंकज बरडे, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दतात्रय आवारे आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने