🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

समाज कल्याण सभापती नागराज गेडाम यांच्या हस्ते कॅलेंडर आणि डायरींचे वाटप.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- जिल्हा परिषद चंद्रपूरचे समाज कल्याण सभापती नागराज गेडाम यांनी आज ब्रम्हपूरी तालुक्याचा दौरा केला. जुगनाला येथे विविध विकास कामांचे भूमीपुजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते.
यावेळी जि.प.चंद्रपूरच्या समाजकल्याण विभागामार्फत कॅलेंडर आणि डायरीचेे जि. प. पदाधिकारी आणि पं. स. पदाधिकारी तसेच अनेकांना वाटप करण्यात आले. सकाळचे लोकप्रिय पत्रकार राहुल मैंद यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून नागराज गेडाम यांनी राहुल मैंद यांना डायरी आणि कॅलेंडर देऊन वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद चे सदस्य तसेच जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे, पं.स.सभापती प्रा. रामलाल महादेव दोनाडकर, जिल्हा परिषद सदस्या अॅड. दिपाली मेश्राम, उपसभापती सौ. सुनीता बाबुराव ठवकर, माजी सभापती तथा सदस्या सौ. प्रणालीताई प्रमोद मैंद, पंचायत समिती सदस्य प्रकाश ननावरे, पंचायत समिती सदस्या सौ. उर्मिला प्रेमलाल धोटेे, पंचायत समिती सदस्या सौ. ममता दिवारू कुंभारे, माजी सभापती रवि मेश्राम तसेच युवा नेते ज्ञानेश्वर पाटील दिवटे ठेकेदार, भाजपा सोशल मीडिया संयोजक अविनाश मस्के, भाजपा सोशल मीडिया संयोजक धीरज पाल, सिंदेवाही पंचायत समितीचे सदस्य तथा गटनेते श्री. रितेशभाऊ अलमस्त हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत