जुनगाव येथील 35 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- मुल पोलिस ठाणे अंतर्गत येत असलेल्या पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव येथील जोगेश्वर मुकुंदा कांबळे वय अंदाजे 35 वर्ष या युवकाने आपल्या स्वतःचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवार रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे कळते की, जोगेश्वर मुकुंदा कांबळे हा युवक विवाहित असून त्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. त्याला दारूचे व्यसन लागल्यामुळे त्याची पत्नी त्यांच्या जवळ राहत नव्हती. दारूच्या जास्त आहारी गेल्यामुळे मृतक जोगेश्वर हा सैरभैर झाला होता.
मूलबाळ व पत्नी आपल्यापासून दूर राहत असल्याची खंतही त्याच्या मनात होतीच. याच दरम्यान काही कारणावरून वडील मुकुंदा सोमा कांबळे यांचेशी घरगुती वाद झाल्याचे कळते. याच वादाचा परिणाम म्हणून त्याचा वडील मुकुंदा हा गाव आणि घर सोडून बाहेर कुठेतरी राहत होता. याच संधीचा फायदा घेत जोगेश्वर निहाय टोकाचे पाऊल घेतले व आपल्या राहते घरीच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना देण्यात आली. बेंबाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत.