💻

💻

४ लाखाचा देशी दारूसाठा जप्त; ३ आरोपी अटकेत.भद्रावती:- पोलिसांच्या संयुक्त कारवाईत भद्रावती शहरातील गौराळा येथे ४ लाखाचा देशी दारूसाठा जप्त करण्यात आला. यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले ही कारवाई पहाटेच्या सुमारास करण्यात आली.
अक्षय मन्ने , प्रवीण मंगल कटारे ,सुरज चंपत आगडे सर्व रा. गौराळा ता. भद्रावती असे आरोपीचे नाव आहे.
कटारे यांच्या सुरक्षा भिंतीमधील परिसरात दारू साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्याआधारे चंद्रपूर व भद्रावती पोलिसांनी संयुक्त धाड टाकून ४ लाखाचा देशी दारु साठा जप्त केला व यातील ३ आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अमोल तुळजेवार गुन्हे अन्वेषण विभाग भद्रावती, शशांक बदमवार, हेमराज प्रधान, निकेश ढेंगे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत