भद्रावती:- भद्रावती शहरातील चंडिकावार्ड येथे राहणाऱ्या 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपीचे नाव प्रदीप पत्रू राणे वय 22 वर्ष राहणार काटोल तुकुम असे आहे.
अल्पवयीन मुलगी हे बाहेर बसली असता प्रदीप हा मोटर सायकल घेऊन घराजवळ आला व तिला तुझ्याशी काही काम आहे असे म्हणून बाहेर बोलावले व तिचा हात पकडून ओढतान केली. या घटनेची माहिती घरच्यांना मिळताच त्याने या घटनेची तक्रार भद्रावती पोलीसांना दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग तसेच पास्को गुन्हा दाखल करण्यात आला आहे.