🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

तरुणावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- वरोरा तालुक्यातील जामगाव येथील रहिवासी असलेल्या दिनेश गोरवे वय 39 या इसमावर सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास राजू रा. जामगाव वय 38 यांनी धारदार चाकूने हल्ला केला. त्यात दिनेश गोरवे गंभीर जखमी झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. जखमी दिनेश गोरवे यांच्या पोटाला गंभीर जखमा झाल्या आहे. आरोपी राजू व दिनेश गोरवे यांच्यात पुर्व वैमनस्य असल्याने हा प्राणघातक हल्ला केल्याचे कळते यात अनैतिक संबंध असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची वरोरा पोलिसांनी दखल घेऊन तपास सुरू आहे.