🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांची नागभीड तालुक्यात भेट.

ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस...


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागभीड:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकारला सलग ७ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संपूर्ण देशात भाजपाच्या वतीने सेवासप्ताह साजरा केल्या जात आहे. या अनुषंगाने माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपा ओबीसी मोर्च्याचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराजजी अहिर हे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात भेटी देत आहेत. प्रत्येक तालुक्यातील कोरोना योध्द्यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करीत आरोग्यविषयक आढावा घेत आहेत. तसेच भाजपात अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना भेटी देऊन आस्थेने विचारपूस करीत आहेत.


    नागभीड तालुक्यात जनसंघापासुन काम करीत असलेले तळोधी ( बा.) येथील जि.प. चे माजी सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  नानासाहेब पोशट्टीवार यांची हंसराजजी अहिर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. ८६ वर्षीय नानासाहेबांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस करीत त्यांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व कौटुंबिक तसेच राजकीय सद्यस्थितीवर चर्चा केली.


     या प्रवासात त्यांनी भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष मोरेश्वरजी ठिकरे यांची सावरगाव व होमदेव मेश्राम यांची वलनी येथील निवासस्थानी भेट घेत कुटुंबियांशी चर्चा केली. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री व जि.प.सदस्य संजय गजपुरे , सिंदेवाही तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्र बोरकर यांची उपस्थिती होती.