Top News

गडचिरोली जिल्हा 'अनलॉक' च्या पहिल्या टप्प्यात उद्यापासून काय सुरू, काय बंद?



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- 'ब्रेक द चेन' अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी आज गडचिरोली जिल्हा अनॅलाक करण्याचा आदेश जारी केला आहे. यानुसार, पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीची दुकाने वगळता सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दररोज, तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरू राहणार आहेत.
राज्य सरकाने अनलॉकसंदर्भात ठरविलेल्या निकषानुसार, गडचिरोली जिल्ह्याचा समावेश पातळी क्रमांक ३ मध्ये होतो. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज आदेश जारी केला आहे.
अत्यावश्यक सेवेची दुकाने....

आजच्या आदेशानुसार, अत्यावश्यक सेवेत मोडणारी दुकाने सोमवार ते रविवार असे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरु राहतील. परंतु पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीची दुकाने बंदच राहतील.
इतर दुकाने....

अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरु ठेवता येतील.
रेस्टारंट आणि उपहारगृहे.....

रेस्टारंट आणि उपहारगृहे सोमवार ते शुक्रवारपर्यंत दररोज सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत ५० टक्के डायनिंग क्षमतेसह सुरु ठेवण्याची मुभा असेल. तथापि, इतर वेळेस पार्सल वा होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.
कृषीसंबधी दुकाने.....

कृषीविषयक सेवा, दुकाने सोमवार ते रविवार सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरु ठेवता येतील.
सलून.....

व्यायामशाळा, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्स इत्यादी सेवा सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सर्व दिवस ५० टकके क्षमतेसह सुरु ठेवण्याची मुभा राहील. परंतु एअर कंडिशनचा वापर करता येणार नाही.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था.....

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १० टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येईल. तथापि, या वाहनांमधून आसन व्यवस्थेव्यतीरिक्त उभ्याने प्रवासी नेण्यास मनाई असेल. कार्गो सेवा नियमितपणे सर्व दिवस सुरु राहील.
आंतरजिल्हा वाहतूक.....

आंतरजिल्हा वाहतूक नियमितपणे सुरु राहील. परंतु 'निर्धारित पातळी-५' च्या जिल्ह्यात अतितातडीच्या कामासाठी जायचे झाल्यास त्यासाठी ई-पास आवश्यक असेल. उत्पादनसेवा नियमितपणे सुरु राहतील.
बांधकाम क्षेत्र....

सोमवार ते रविवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत बांधकाम करता येईल. परंतु ४ वाजतानंतर कामगारांना काम करण्याची परवानगी नसेल.
ई-कॉमर्स साहित्य.....

ई-कॉमर्स साहित्य व सेवा नियमितपणे सर्व दिवस सुरु असतील.
सार्वजनिक स्थळे.....

सार्वजनिक स्थळे, खुले प्रेक्षागृह, मॉर्निंग वॉक, सायकलिंग हे सर्व दिवस सकाळी ५ ते ९ पर्यंत करता येईल.
खासगी व सरकारी कार्यालये.....

खासगी कार्यालये सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरु ठेवण्याची मुभा राहील. खासगी वा सरकारी कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह सुरु ठेवता येतील. याहून अधिक उपस्थितीची गरज भासल्यास संबंधित विभागप्रमुखाला जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागणार आहे.
क्रीडाक्षेत्र....

सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ९ पर्यंत क्रीडाविषयक बाबी सुरु ठेवता येतील.
सामाजिक कार्यक्रम.....

सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनाचे कार्यक्रम कोविड-१९ च्या निर्देशांचे अधिन राहून व सामाजिक अंतर राखून ५० लोकांच्या मर्यादेत करता येतील. विवाहासाठी ५०, तर अंत्यविधीसाठी २० लोकांच्या उपस्थितीचे बंधन कायम आहे.
स्वराज्य संस्था....

स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांच्या बैठकीसाठी ५० लोकांची मर्यादा असेल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने