जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

ग्रामपंचायत कार्यालय मुधोली तुकूम येथे "शिवस्वराज्य दिन" साजरा.


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- ग्रामपंचायत कार्यालय मुधोली तुकूम येथे भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून, पुजन व त्यास नमन करून साजरा करण्यात आला.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ६ जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.शिवरायांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ दिवशी झाला. त्यामुळे दरवर्षी ६ जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची महती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावी म्हणून शिवस्वराज दिन साजरा करण्याचा निर्णय राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने घेतला.
या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळा 'शिवस्वराज्य दिन' म्हणून ग्रामपंचायत कार्यालय मुधोली तुकूम येथे कोरोनाचे नियम पाळून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रा.प कार्यालय मुधोली तुकूम येथे सरपंच सौ शकुंतला रवींद्र डाकोटे यांच्या हस्ते शिवशक राजदंडवत स्वराज्य गुडीची उभारणी करण्यात आली. सदर कार्यक्रमास ग्रा.प.उपसरपंच दिलीप दादा वर्धलवार व ग्रा.प.इतर सदस्य तसेच सचिव यादव लक्ष्मण बोकडे व संगणक परिचारिचालक रितेश एस आसमवार व युवा संकल्प प्रमुख विशाल बंडावर व प्रतिष्ठीत नागरिक पुरुषोत्तम नागपुरे तसेच गावातील युवा वर्गातील कु-रामकुष्ण झाडे, ईश्वर तीमाडे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत