Top News

वृक्षसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी- अरुण धोटे, नगराध्यक्ष

🆘
🆘
इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून नर्सरी मार्गाच्या दूर्तर्फा वृक्षारोपन.

१५०० वृक्षलागवडिचा संकल्प.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
 राजुरा:- राजुरा  शहरातील इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुप कडून शहरालगत असलेल्या वनविभागाच्या नर्सरी मार्गाची स्वच्छता करण्यात आली. व या मार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवड करण्यात आली.या मार्गावरील काचेच्या व पाण्याचा रिकाम्या बॉटल्स, वेफर्सचे प्लास्टिक आवरण व अन्य पदार्थ जमा करण्यात आले. या मार्गावर पहाटे आणि सायंकाळी मैदानी खेळाचा सराव करणार मुलं, व्यायामासाठी येणारे जेष्ठ नागरिक  यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांनी ही स्वच्छता मोहीम राबवीत वृक्षारोपन केले. 
🆘
🆘
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण धोटे, नगराध्यक्ष नगर परिषद राजुरा हे होते  तर उद्घाटक म्हणून सुनील देशपांडे, उपनगराध्यक्ष न.प. हे होते. प्रमुख अतिथि म्हणून नगरसेवक राजेंद्र डोहे, गजानन भटारकर ,भाउजी कन्नाके ,आरपीआय(आ.) जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ पथाडे ,नेफडोचे नागपूर विभाग सचिव बादल बेले, तालुका अध्यक्ष संतोष देरकर, घनश्याम हिंगाने ,सुधाकर चांदेकर  , राजू धोटे, सामाजिक वणिकरण विभागाचे वनपाल विलास कुंदोजवार ,गिरडकर , गजानन सावनकर, प्रदीप कडवाने ,आसिफ सय्यद, जेष्ठ नागरिक बाणकर आदींची उपस्थिति होती. यावेळी नगराध्यक्ष धोटे यांनी युवकांनी वृक्षारोपण करण्याच्या संकल्पाचे कौतूक करीत ही सामूहिक जबाबदारी असून झाडे लावणे आणि टते मोठ्याप्रमाणात जगवणे अत्यंत महत्वाचे आहे त्याकरिता इविनिंग स्टार फ्रेंड्स ग्रुपच्या सदस्यांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या युवकांनी  एकत्र येत शुक्रवार रोजी सांयकाळी या मार्गावरील स्वच्छता केली. आणि आज ६ जून ला भव्य वृक्षारोपन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार  बंडु बोढे यांनी मानले तर प्रास्तावीक आकाश वाटेकर यांनी केले. 
🆘
🆘
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता चेतन सातपुते, सतिश बानकर, जगदीश साठोने, आकाश वाटेवर, भुपेंद्र साठोने, बबलू चव्हाण, प्रज्वल उराडे, राहुल पिदूरकर, विकी भोज, दिनेश ठाकरे, पवन पिंपळशेंडे, शुभम सोयाम, पचारे, अक्षय गावंडे, संदीप मडावी, दिनेश कवलकर, उमेश मंगुळकर, गजानन बेले, लुकेश बुतले, विजय काळे, सुधीर लोणारे, नागेश जाधव, विशाल मंढरे हरजित सिंग संधू आदीं युवकांनी सहभाग घेतला.🆘

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने