चेक आष्टा फाट्याजवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात. Accident

Bhairav Diwase
एक गंभीर जखमी‌; चंद्रपूरला रेफर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा-चिंतलधाबा मार्गावरील चेक आष्टा फाट्याजवळ दोन दुचाकी चा समोरासमोर भीषण अपघात झाला. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. अपघातात चेक आष्टा येथील घनश्याम ताजणे अंदाजे ५० वर्षे हा गंभीर जखमी‌ झाला असून त्याला तात्काळ पोंभूर्णा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूरला रेफर करण्यात आले आहे.