ओबीसी आरक्षणासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन:- देवराव भोंगळे.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द होण्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा आणि वेळकाढूपणाचे धोरण कारणीभूत आहे आरक्षणाच्या रक्षणार्थ येत्या 26 जून 2021 रोजी भाजपच्या वतीने जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने सुप्रीम कोर्टात चालू असलेल्या केसमध्ये या पंधरा महिन्यात काहीच लक्ष दिले नाही, वकिलांची फौज उभी केली नाही तसेच ओबीसींचा एम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारने केलेले नाही याऊलट केंद्राकडे बोट दाखवुन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न हे राज्यातील शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार करत आहे, राज्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत ठेवण्याकरिता भारतीय जनता पार्टीकडून जील्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे .
शनिवार 26 जुन 2021 च्या रास्ता रोको आंदोलनाकरिता पडोली चौक येथे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहे तर वरोरा येथे भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर उपस्थित राहणार आहे तसेच नागभीड चिमूर मध्ये आमदार बंटी भाऊ भांगडीया हे उपस्थित राहतील तर बामणी फाटा येथे नगराध्यक्ष बल्लारपूर हरीशजी शर्मा भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल माजी आमदार संजय धोटे,सुदर्शन निमकर हे उपस्थित राहणार आहे , ब्रह्मपुरी येथे माजी आमदार अतुल भाऊ देशकर हे उपस्थित राहतील.
या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त जनतेनी सहभागी व्हावे तसेच जनतेनी साडेदहा ते एक या वेळेस आपला प्रवास आंदोलनाच्या मार्गावर करू नये असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष देवराव भोंगळे आणि महानगरचे अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.