पोंभुर्णा:- वृक्ष हे पर्यावरणाचा एक महत्वपुर्ण अंग आहे.मानवाच्या जिवनात वृक्षाचे महत्त्वाचे स्थान आहे.अन्न वस्र आणि निवारा या तिन मानवाच्या मुलभुत गरजा आहेत .या तिन्ही गरजा पुर्ण करणार निसर्गाच देण म्हणजे "वृक्ष" म्हणुन काहि संतांनी म्हटले आहे कि "वृक्ष वल्ली आंम्हा सोयरे वनचरे" असे वृक्षाबद्दल आणि निसर्गाबद्दल प्रेम व्यक्त केले आहे. याचाच एक भाग म्हणून लोकमत सखीमंच पोंभुर्णा तर्फ दिनांक 24-06-2021 ला प्रभाग क्र.4 मध्ये वटपोर्णीमा निमित्ताने वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.