🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

मी ओबीसी आहे म्हणून मला महसूल खातं दिल नाही:- ना. विजय वडेट्टीवार.


पुणे:- लोणावळ्यात ओबीसी चिंतन बैठकीत भाष्य करताना राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. पंकजा ताई तुम्ही ग्रामविकास मंत्री होता मी विरोधी पक्ष होतो. त्यामुळे वाटले महसूल खाते मिळेल पण मिळाले ओबीसी खाते मिळाले. ओबीसी असल्याने मदत आणि पुर्नवसन खातं मला मिळालं. मला वाटलं होतं महसूल खाते मिळेल. ओबीसी खातं दिलं तेव्हा चपरासी सुद्धा नव्हता. मंत्रालय स्टाफ नाही, निधी नाहीये, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याकडे वारंवार फॉलोअप घ्यावा लागला. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खाते चालवतोय अशी खदखद त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली.
हक्कांसाठी लढणे, ही आपल्यासाठी आजची गरज आहे. "झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहीये.", असे म्हणत त्यांनी ओबीसी बांधवांमध्ये जोश निर्माण केला. ओबीसी मंत्रालय तुमच्याच राज्यात झाले, ते बरे झाले कारण ते मंत्रालय तयार झाले म्हणून मला मिळाले. पण जेव्हा मिळाले तेव्हा तेथे चपराशीही नव्हता, तोही भाड्याने घ्यावा लागला.
मी ओबीसी मंत्रालयासाठी पैसा मागितला, तर आपलंच सरकार म्हणतं पैसा नाही. आपण एकत्र नसल्यामुळे ही स्थिती झाली आहे. मी विरोधी पक्ष नेता होतो, त्यामुळे मला वाटलं होतं की, महसूल सारखे महत्वाचे खाते मिळेल, पण मिळाले ओबीसी मंत्रालय.