Top News

ज्वलंत विद्युत तारेच्या स्पर्शाने एकाचा मृत्यू.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- वरोरा तालुक्यातील चिकनी परीसरात शेतकऱ्यांचा 340केवि पोलच्या जिवंत विद्युत तारेच्या तगावेला हात लागल्याने जागेवरच मृत्यू झाला.
रविवारी सकाळी शेतकरी मारोती विठूजी ढेंगळे वय 65 वर्षे रा.चिकनी हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असता जवळच असलेल्या कृषी पंपाच्या पोलच्या तगावाला हात लागल्याने जागीच मृत्यू झाला. त्यामुळे चिकणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून यासाठी विद्युत वितरण कंपनीला जबाबदार ठरवले आहे. उन्हाळ्यामध्ये विद्युत वितरण कंपनीने या भागातील विद्युत वाहिनीचे मेन्टेनन्स केले नसल्याने बहुतांश ठिकाणी पोल ला लागून असलेल्या तगाव्या मध्ये करंट आला आहे. ही बाब महावितरणला कळताच महावितरणचे अधिकारी भोयर यांनी पाहणी करून तात्काळ विद्युत वाहिनीचा संपर्क बंद केला. यानंतर विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी याठिकाणी युद्ध स्थळावर काम सुरू केले आहे. मात्र चिकनी परिसरात होतकरू शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने या परिसरातील जनते मध्ये रोष आहे.
मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले होते. मात्र काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
यावेळी मुतकाचे नातेवाईक अविनाश चिचोळकर, राजू चिकटे, डॉक्टर हेमंत खापने, मंगेश देहारकर, राहूल ठेंगणे, व सामाजिक कार्यकर्त यांनी स्थिती सांभाळत महावितरण कंपनीला जबाबदार धरत परिवाराला तात्काळ चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ही मागणी महावितरण कंपनीने मान्य केल्यानंतर शवविच्छेदन करून आप्त परिवारास सोपवण्यात आले. मात्र महावितरण कंपनीच्या या गलथान कारभारामुळे एकाचा जीव गेला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने