💻

💻

पशुचिकित्सक कर्मचारी संघटनेचे असहकार आंदोलन.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपुर:- गेल्या तीस वर्षापासून पशुधन पर्यवेक्षक , सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी गट ब यांच्या मागण्या बाबत अनेक वेळा पशुसंवर्धन आयुक्त, पशुसंवर्धन मंत्री यांच्याशी चर्चा करून झाल्या अद्याप ही अकरा मागण्यांपैकी एकही मागणी मान्य करण्यात आलेली नाही. राज्यातील पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन विकास अधिकारी गट ब यांच्या मागण्या बाबत ७ जून ला राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन आयुक्त यांच्या शी चर्चा केली. 
मात्र मागण्या बाबत सविस्तर बाजू मांडण्याची संधी न देता ११ मागण्यांपैकी दोन मागण्यांवर अर्धवट चर्चा करत बैठक संपवली . शेतकरी उदरनिर्वाहासाठी कुकुट पालन , शेळीपालन ,दुग्धव्यवसाय या जोड धंद्याकडे वळलेला आहे त्या पशुपालकांचे औषधोपचार व देखभाल करण्याची जबाबदारी पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच पशुधन विकास अधिकारी गट ब या सर्व संवर्गातील कर्मचारी नित्यनियमाने पार पाडत आहे . च्या पशुसंवर्धन कायद्याप्रमाणे या संवर्गाला औषधोपचार व इतर अनुषंगिक तांत्रिक कामे करता येत नसताना ही अनधिकृत कामे करून घेण्यात येत आहेत. 
या १९८४ चा एक्ट रद्द करण्याच्या मागणीसह इतर मागण्या संदर्भात कार्यकारी मंडळाने चर्चा करूनही मागण्या मान्य झालेल्या नाहीत .म्हणून यानंतर पुढच्या टप्प्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत संघटनेने दिलेले आहेत.म्हणून या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा संलग्नित पशुचिकित्सा व्यवसाय संघटना शाखा ब्रम्हपुरीच्या पदाधिकारी यांच्यावतीने गट विकास अधिकारी तथा पशुधन विकास अधिकारी विस्तार यांना निवेदन देण्यात आले आहे . यावेळी डॉ. कंकटवार तालुकाध्यक्ष , डॉ. शेंडे , डॉ .मडीवार मॅडम, डॉ. राजूरकर मॅडम, डॉ. लाडे , डॉ. माथनकर , डॉ. मेश्राम इ. उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत