💻

💻

नायवाडा येथे सार्वजनिक वाचनालयासाठी इमारत मंजुर करून द्यावी.

आम आदमी पक्षाकडून उपसभापती महेशभाऊ देवकते यांना निवेदन.


जिवती:- अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील नायवाडा येथे सार्वजनिक वाचनालयासाठी नवीन इमारत देऊन गावातील तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची अत्यावश्यक गरज असल्याने महोदयांनी सोरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत नायवाडा येथे सार्वजनिक वाचनालयासाठी इमारत मंजुर करून मिळण्याबाबत आम आदमी पक्षाचे तालुका उपाध्यक्ष श्नी मा.सुनिल भाऊ राठोड यांच्याकडून जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी मा. महेश भाऊ देवकते यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी महेश भाऊ देवकते यांनी शिक्षणाचे महत्त्व समजून आम्ही लवकरच वाचणालयासाठी इमारत उपलब्ध करून देऊ व सर्व गरजु युवक व शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनालयाची अत्यावश्यक गरज पुर्ण करु असे आश्वासन दिले या वेळी उपस्थित आम आदमी पक्षाचे ता. उपाध्यक्ष श्नी सुनील भाऊ राठोड ता. सचिव श्नी गोविंदजी गोरे रूग्णसेवक श्नी जिवन तोगरे सुनील जाधव सर बबलु चव्हाण अनिल पवार प्रविण पवार आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत