Top News

म्युकरमायकोसिसची गांभिर्याने दखल घ्यावी.

डाॅ.अंकुश आगलावे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- म्युकरमायकोसिस या आजाराची गांभिर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केंद्रिय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डाॅ.अंकुश आगलावे यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नुकतीच केली आहे. 
       मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात डाॅ.आगलावे यांनी म्हटले आहे की, कोरोना आजाराप्रमाणे म्युकरमायकोसिस हा आजार हळूहळू मोठ्या प्रमाणात नागरिकांना संक्रमित करीत आहे. कोरोनापेक्षाही भयंकर आजार असल्याचे दिसून येत आहे. या आजाराने अनेक रुग्ण दगावत आहेत. याची माहिती शासन लपवित असल्याचे  दिसून येते. म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. नियोजन व औषधी अभावी रुग्ण दगावत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात इंजेक्शन व औषधीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नोडल अधिकारी म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन देण्यास टाळाटाळ करीत आहेत.असाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना वाईट वागणूक मिळत असल्याचाही आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
      महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे रुग्णांचे मोफत उपचार होण्यास पात्र असताना देखिल काही खाजगी रुग्णालये बेड चार्ज, रुम चार्ज, औषधी खर्च, शस्त्रक्रिया खर्च रुग्णांकडून घेतात. या प्रकारामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक हताश व हतबल झाले आहेत. असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने