🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चंद्रपूर जिल्ह्यात आस्थापणाच्या वेळेत आजपासून बदल.

वाचा सविस्तर काय सुरू, काय बंद.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट चा धोका लक्षात घेत राज्य सरकारने जिल्ह्यातील निर्बंधात आणलेली शिथिलता कमी केली असून आता अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक दुकानाच्या वेळा कमी करण्यात आल्या आहे, अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक प्रतिष्ठाने आता सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आस्थापणाच्या वेळेत बदल. https://www.adharnewsnetwork.com/2021/06/gadchiroli.html

चंद्रपूर दारुबंदी उठविण्याचा निषेधार्थ.


 जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशाप्रमाणे आता अत्यावश्यक आस्थापने सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील, बिगर अत्यावश्यक आस्थापने सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व शनिवार व रविवारी पूर्णतः बंद राहणार.

     मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृहे संपूर्णतः बंद राहतील, रेस्टॉरंट 50 टक्के आसनक्षमतेसह सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत तर सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत पार्सल सुविधा सुरू राहणार.
    सार्वजनिक स्थळ, खुली मैदाने सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत, सर्व प्रकारचे खाजगी कार्यालय सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू, शासकीय कार्यालयात 50 टक्के आसनक्षमतेसह सुरू असणार, लग्न समारंभ 50 नागरिकांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी 20 व्यक्ती मर्यादित संख्येत असणार.
      व्यायामशाळा, स्विमिंग पूल, केस कर्तनालय सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहे नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या चुकीसाठी 5 हजार, दुसऱ्या चुकीसाठी 10 हजार तर तिसऱ्या वेळेस 20 हजारांचा दंड थोपटल्या जाणार आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर पाळणे व मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे.