Top News

टाॅलीवुड इंडिपेंडेन्ट शार्ट मुव्हीचे चिञीकरण.

महेश कोलावार यांनी साकारली देशभक्ताची भूमिका.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर :- चंद्राआदित्या फिल्मस फॅक्टरी बॅनर प्रस्तुत एका टाॅलीवुड इंडिपेंडेन्ट शार्ट मुव्हीतील दोन मिनीटाच्या भागाचे चिञीकरण काल चंद्रपूर येथे करण्यात आले.या चिञपटामध्ये चंद्रपूरचे युवाकवी तथा भाजपा युवानेते महेश कोलावार यांनी स्मगलिंगन्सच्या काळाबाजारानीं देशाच्या आर्थिक परीस्थितीला बादा आणणा-या स्मॅगलर्स व दरोडेखोरांवर शब्दांनी हल्लाबोल करणा-या देशभक्ताच्या भूमिकेत अभिनय केले.
सहकलाकार म्हणून चिन्मय पवार,सुरज घोडमारे,बंडु गौरकार इत्यादींनी आपला सहभाग नोंदविला आहे.चिञपटाचे दिग्दर्शक,निर्माते डाॅ.पी.सी आदित्या यांच्या स्वीय दिग्दर्शनात या भागाचे दिग्दर्शन महेश कोलावार यांनी केले असून कॅमेरामॅन म्हणून रोशन परकोटवार काम पाहिले आहेत.
चिञपटाचे विशेष म्हणजे दिग्दर्शकांनी एक नवीन प्रयोग केला आहे.हैद्राबादला स्वता: घरी राहुनच त्यांच्या संबधीत जगभरातील अभिनेते, कलाकारांना चिञपटाच्या कथेतील एक-एक भाग कलाकाराला समजावून सांगून त्यांनाच दिग्दर्शन व अभिनय करायला लावले आहे.मागील १५ ते २० दिवसांपासून या इंडिपेंडेन्ट शार्ट मुव्हीचे शुटींग जगभरातल्या ठिकठिकाणी सुरु आहे.
चिञपटाचे दिग्दर्शक डाॅ.पी.सी आदित्या हे गेल्या दोन दशकापासून चिञपटात कार्यरत आहेत.१०० दिवसात १०० शाॅर्ट फिल्मस काढून लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डमध्ये स्थान मिळविले असून राष्ट्रीय व जागतिक पातळीवर २० च्या वर रेकार्डस तसेच १० च्या वर चिञपट दिग्दर्शीत केले आहे.त्यांच्या चिञपटाच्या योगदानाबद्दल नाशिक येथील दादासाहेब फालके फाऊंडेशन तर्फे 'दादासाहेब साहेब फालके मेमोरीयल पुरस्कार व दिल्लीच्या एका नामांकित संस्थेतर्फे 'सुपरस्टार आॅफ इंडिया' पुरस्कार आणि विदेशातील एका विश्वविद्यालयाकडून 'डाॅक्टरेट' पदवीसहीत राज्यसरकार तसेच देश-विदेशातील विविध संस्थेमार्फत ५० च्या वर पुरस्कार प्राप्त झालेे आहेत.चिञपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याने महेश कोलावार यांनी यावेळी आनंद व्यक्त केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने