🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी.


उसेगाव येथील घटना.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील उसेगाव येथे शेतात पराटी फवारणी करीत असलेल्या शेतकऱ्यांवर रानटी डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना (दि.26) रोजी साय. च्या सुमारास घडली. रमेश मेश्राम असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्याला पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.
रमेश मेश्राम हे इंद्रजित मेश्राम यांचे नदी काठी असलेल्या शेतात फवारणी करिता गेले होते आणि सायंकाळच्या सुमारास लपून बसलेल्या रानडुक्कराने रमेश यांचेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमी शेतकऱ्यास सावली येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. पुढील तपास सावली वन विभाग करीत असून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. सध्याच्या परिस्थितीत रानडुकरांच्या वाढत्या संख्येने शेतकरी संकटात सापडला आहे शेतकरी शेतात लावलेल्या पिकावर हल्ला करून नासाडी करणे, शेतकऱ्यांवर हल्ला करणे असे अनेक प्रकारचे नुकसान रानडुकरामुळे होत असून शासनाने याचा त्वरित बंदोबस्त करावा. अथवा मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.