दारूबंदी उठविल्यामुळे भद्रावती परिसरात सट्टा व्यवसाय जोमात.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- महाराष्ट्र शासनाने चंद्रपुर जिल्ह्यातील दारू बंदि उठविल्या मुळे तळिरामांनमध्ये व जुन्या दारू व्यवसायिकामध्ये आनंदाची लाट पसरली असुन नविन अवैध दारू विक्रेत्यांनमध्ये नारजीचा सुर पसरला असुन त्यांनी जोमाने सट्टा व्यवसाय सुरू केल्याचे चिञ भद्रावती परिसरात दिसुन येत आहे.

चेक आष्टा फाट्याजवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात.

महाराष्ट्रातील भाजपा सेना युतिचा काळात चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंदि करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, या आघाडी सरकारचा काळात चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदि उठविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. चंद्रपुर जिल्हात दारूबंदी असतांना मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतुक व विक्री करण्याला मोठे उधाण आले होते. अवैध दारू विक्री करून झटपट श्रीमंत होण्याचा नादात अनेक अल्पवयीन मुले, इतर कामे करणारा मजुर वर्ग, घरातील विद्यार्थी, महिला या व्यवसायात गुंतले होते. 
परंतु आता दारूबंदी उठवल्यामुळे त्यांचा अवैध दारू विक्री व्यवसायाला अवकळा आल्याने हे अवैध दारू व्यवसायिक सट्टा व्यवसायाकळे वळले असुन त्यांचा हा सट्टा व्यवसाय भद्रावती परिसरात जोमात चालु आहे. त्यामुळे जुन्या  सट्टा व्यवसायिकांना आपले सट्टा लावणारे ग्राहक कमी होण्याची भिती वाटत आहे. असे सट्टा शौकिनांमध्ये बोलले जात आहे.या अवैध सट्टाव्यवसाया कडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.