Top News

आणीबाणीतील लोकतंत्र सेनानींचा हंसराज अहीर यांचेव्दारा सन्मान.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांनी 25 जुन 1975 मध्ये देशावर आणीबाणी लादली व या कालावधीत दमनकारी नितीचा अवलंब करून लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले या विरूध्द आवाज उठविणाऱ्यांना कारागृहात डांबले, अत्याचार केले, अनन्वित छळ केला त्यामुळे भाजपाव्दारे दरवर्षी हा दिवस संपूर्ण देशभरात सर्वत्र ‘‘काळा दिवस’’ म्हणुन पाळण्यात येतो. दि. 25 जुन 2021 रोजी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील आणीबाणी विरुध्द लढा देवून सत्याग्रहाचा अवलंब करीत कारागृहात शिक्षा भोगलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्यांच्या निवासस्थानी जावून पूष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून यथोचित सन्मान केला व ज्येष्ठे मान्यवरांचे आशिर्वाद घेतले.
आणीबाणीच्या विरुध्द कसलीही तमा न बाळगता लोकशाहीच्या रक्षणासाठी निर्भयपणे पुढे येत तत्कालीन सरकारच्या दडपशाही विरुध्द आवाज उठवून शिक्षा भोगलेल्या भाजपा नेत्या, पूर्व मंत्री श्रीमती शोभाताई फडणविस, भद्रावती येथील मनोहरराव पारदे, बळवंतरावजी गुंडावार, विवेक जी सरपटवार, वरोरा येथील बाबाभाऊ भागडे, चंद्रपूर येथील बंडूभाऊ पद्लमवार, गिरीष अणे आणि वणी येथील मोहम्मद रफिक रंगरेज यांचा सन्मान केला.
यावेळी हंसराज अहीर यांनी या सर्व मान्यवरांचे आणीबाणीच्या काळातील योगदान अभूतपूर्व असून विद्यमान व भावी पिढ्यांना संघर्षाची जाणीव करुन देणारे असल्याने या लोकतंत्रा सेनानींचा सन्मान करतांना अपार आनंद व गर्व वाटतो अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. या सत्कार प्रसंगी वणी चे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार, वणी चे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय राऊत, खुशाल बोंडे, राजु घरोटे, गजानन विधाते, किशोर बावणे, पं.स. मुल सभापती चंदु मारगोनवर, प्रशांत समर्थ, महेंद्र खरकाडे, प्रशांत लाडवे, प्रशांत बोबाटे, राकेश ठाकरे, संतोष ठाकुरवार, प्रकाश चामटपल्लीवार, राकेश समर्थ, प्रविन मोहुर्ले, बबन गुंडावार, प्रमोद तोकुलवार, चंद्रकांत गुंडावार, प्रविण सातपूते, किशोर गोवारदिपे, संजय वासेकर, इम्रान खान, गोपाल गोसवाडे, डाॅ. भगवान गायकवाड, ओम मांडवकर, सुरेश महाजन यांची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने