🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक.

अपघातात 2 मृत्यु तर 1 जण गंभीर जखमी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- चिमुर शहरातिल आर.टी.एम कॉलेज समोर दुचाकीची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन दोघांचा जागेवरच मृत्यु झाला तर एक गंभीर जखमी आहे. हि घटना दि.27 जुन 2021 ला दुपारी 12:00 वाजता च्या सुमारास घडली. चिमुर वरुन कांपा कडे अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड हे एका दुचाकीवर कांपा च्या दिशेने चालले होते. आणि अतुल चौधरी नाचणभट्टी हे आपल्या दुचाकीने कामानिमीत्य चिमुर ला येत होते.
या दोन्ही दुचाकीची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या घटनेत इंदिरा नगर चिमूर येथील अजय महादेव राऊत व सनी छत्तीसगड यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यात अतुल चौधरी नाचणभट्टी हा इसम गंभीर जखमी असून त्यांचेवर उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार सुरु आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा केला, पुढील तपास चिमुर पोलीस करीत आहेत.