Top News

धीडशी उपसरपंच राहुल सपाट यांच्या वाढदिवसानिमित्य रक्तदान शिबिर व शोभिवन्त वृक्षारोपण.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आज दिनांक 27 जून रोजी राजुरा तालुक्यातील धीडशी ग्रामपंचायत चे उपसरपंच श्री राहुल सपाट यांचा वाढदिवसाचे औचित्त्य साधून ग्रामपंचायत तर्फे गावातील युवा वर्गात रक्तदानाबद्दल जागृती व्हावी व आपल्याही गावातून रक्तदानासारखे पुण्यकर्म करण्याची सवय कुठंतरी ग्रामीण युवा मध्ये निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून रक्तदान शिबिराचे व गावात दोन्ही मुख्य रस्त्याच्या कडेला शोभा वाढविण्याचा निर्धार करून नारळी जातीचे वृक्ष लागवड सारखे समाजदायी उपक्रम राबविले गेले.

सदर कार्यमाचे उदघाटन या विभागाचे दोन्ही माजी आमदार श्री.संजय धोटे , श्री.सुदर्शन निमकर व जि.प.चंद्रपूर चे कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. सुनील उरकुडे यांच्या सामुहीक हस्ते पार पडले.
त्या प्रसंगी असे समाज उपयोगी उपक्रम सर्वांनी आपापल्या वाढदिवस प्रसंगी राबविले पाहिजे,गावाच्या विकासासाठी समस्त युवा तसेच प्रौढानि सुद्धा ग्रामपंचायत सोबत एकत्र मिळून नवनवे उपक्रम,योजना राबविल्या पाहिजे असे सांगितले व कोरोनावर मात करण्याचे दृष्टीने 45 वर वयोगटातील लसीकरण शंभर टक्के पुर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून जि.प. चंद्रपूर मार्फत घोषणा करून ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे अभिनंदन केले व ग्रामपंचायत च्या मागणीला मान देऊन आपण जि. प मार्फत अवघ्या दोन ते तीन महिन्यात आर.ओ.प्लांट ग्रामपंचायत धीडशी ला मंजूर करून प्लांट सुरू करण्याची घोषणा यावेळी सभापती श्री.सुनील उरकुडे यांनी केली त्यामुळे समस्त गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर द्विगुणित आनंद झाला.प्रत्येक लहान मोठ्या लोकप्रतिनिधींनी,समाजसेवकांनी व ईतरही मान्यवर व्यक्तींनी वाढदिवसानिमीत्य असे समाजऊपयोगी ऊपक्रम राबविले पाहीजे असे कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री.सुनिलभाऊ ऊरकुडे यांनी ऊपस्थित समुदायाला संबेधित केले.

 यावेळी गावच्या प्रथम नागरिक कु. रितू हनुमंते, श्री.हरीभाऊ झाडे सरपंच खमोना,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेविका सौ वरघणे,श्री.सचिन शेंडे अध्यक्ष भाजयुमो राजुरा,श्री.दीपक झाडे,डॉ काकडे,श्री.मधुकर काळे,श्री.अजयभाऊ बंदूरकर,श्री.मारोती चन्ने, डॉ ओदेला समस्त युवा वर्ग व गावकरी कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने