Top News

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे मार्फत छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.

मोफत पाठ्यपुस्तक ,वृक्षारोपन व सभासद नोंदणी चे आयोजन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- छत्रपती शाहू महाराज जयंती नीमीत्य बामनवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान ,तक्षशिला नगर येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत वृक्षारोपण ,मोफत पाठ्यपुस्तक वाटप व सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय जांभूळकर ,जिल्हा संघटक ,नेफडो हे होते तर प्रमुख अतिथि म्हणून विलास कुंदोजवार ,वनपाल ,सामाजिक वनीकरन ,राजुरा ,सर्वानंद वाघमारे ,माजी सरपंच तथा सदस्य ,ग्रा.पं.बामनवाडा ,रजनी शर्मा ,उपाध्यक्ष ,नेफडो ,संतोष देरकर ,अध्यक्ष ,नेफडो ,राजुरा ,विठ्ठल बक्षी, मेघराज उपरे ,किशोर कवठे ,ईश्वर देवगडे ,जेष्ठ नागरिक पाल ,वृक्षसेवक भास्कर करमरकर आदिंची उपस्थिति होती.
यावेळी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरीत्रावर आपले मनोगत व्यक्त केले. नेफडो च्या तालुका उपाध्यक्षा रजनी शर्मा यांच्या तर्फे शिवाजी हायस्कूल चूनाळा येथील इयत्ता नववि व दहावी च्या विध्यार्थीन करिता मराठी व्याकरण चे पुस्तके मोफत देण्यात आले. तसेच बालोद्यान परिसरात वृक्षारोपन आणि नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेची सभासद नोंदणीही करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पूर्वा देशमुख यांनी केले. तर प्रास्तावीक बादल एन. बेले नागपूर विभाग सचिव, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी केले. आभार सूनैना तांबेकर ,तालुका संघटिका यांनी मानले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राजश्री उपगण्लावार ,वर्षा कोयचाडे ,वर्षा वैद्य ,प्रतिभा भावे,माणिक उपलंचिवार , ललिता खंडाळे ,क्रुतीका सोनटक्के ,संदीप आदे , आशीष करमरकर ,नागेश उरकूडे ,दीवाकर गौरकार ,नितीन जयपूरकर ,प्रदीप भावे ,उमेश लढी, सूर्यभान गेडाम आदिंनी अथक परिश्रम घेतले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे मार्फत गेल्या वर्षभरात राबवीन्यात आलेल्या उपक्रम व कार्यक्रमाबद्दल सविस्तरपणे माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने