💻

💻

सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ बाईक रॅली.

बामणी फाट्यावर भाजपा तर्फे चक्का जाम आंदोलन.

शेकडो कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा : भाजपा च्या वतीने संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षणाच्या रक्षणार्थ पुकारलेल्या
आंदोलनात राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात पंचायत समिती चौक येथून बाईक रॅली काढून बामणी फाटा टी पाईंट या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.


रॅलीत युवक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.यावेळी भाजपचे पदाधिकारी अरुण मस्की, प्रशांत घरोटे, विनायक देशमुख, सचिन डोहे, दिलीप वांढरे, वाघुजी गेडाम, भाऊराव चंदनखेडे, संदीप गायकवाड, कैलास कार्लेकर यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
महाविकास आघाडी सरकारने मा. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या प्रकरणामध्ये या पंधरा महिन्यात काहीच लक्ष दिले नाही, वकिलांची फौज उभी केली नाही तसेच ओबीसींचा एम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम राज्य सरकारने केलेले नाही याऊलट केंद्राकडे बोट दाखवुन जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न हे राज्यातील शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार करत आहे, राज्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत ठेवण्याकरिता महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा.हंसराज भैय्या अहिर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या सूचने नुसार भारतीय जनता पार्टीकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 
यामध्ये बल्लारपूर व राजूरा विधानसभेतील प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून शेकडो ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत बल्लारपूर तालुक्यातील बामणी फाट्यावर हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.  याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा, माजी आमदार संजयजी धोटे, माजी आमदार सुदर्शनजी निमकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य सौ.रेणुका ताई दुधे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्काताई आत्राम, ट्रान्सपोर्ट सेलचे जिल्हाध्यक्ष राजू दारी, भाजपाचे मंडळ अध्यक्ष काशिनाथ सिंह, किशोर पंदीलवार, प्रभाकर भोयर, ज्येष्ठ नेता निलेश खरबडे, सतीश धोटे, अरुण मस्की, नारायण हिवरकर, चंदू मारगोणवार, केशवजी गिरमाजी, सुनील उरकुडे, चेतन गौर, सुरेश केंद्रे,निलेश संगमवार, अजित मंगळगिरीवार, नंदू रणदिवे, सचिन डोहे, राकेश पुन, ओम पवार, मोहन चलाख, महेंद्र करकाडे, अश्विन कुसनाके, निलेश फुलगमवार, गोविंदा पोडे, मनीष वासमवार, गोपीनाथ चव्हाण, अमोल चूधरी, प्रशांत समर्थ, विनोद सिडाम, ऋषी कोटरंगे, बंडू बुरांडे, ईश्वर नेताम, मोरेश्वर उदिसे, सोमेश्वर पद्मगिरवार, विनोद देशमुख, प्रकाश मोडपल्लीवार, महादेव तपासे विनायक देशमुख, नाना येल्लेवार, दिलीप वांढरे, वैशालीताई जोशी सभापती येलैया दासरफ, नगरसेविका सौ.पुनमताई मोडक सौ.सारिका ताई कणकम, सौ.सुवर्णाताई भटारकर, सौ.कांताताई ढोके, सौ.आरती ताई आक्केवार, वर्षाताई लोनबळे, स्वाती वडपल्लीवार, भुमी पिपरे, सुनीता मॅकलवार, देवेंद्र वाटकर,सतिष कणकम, अरुण भटारकर,संजय बाचपेई,प्रकाश दोतपेल्ली, सुधाकर पारधी, राजेश कैथवास, मनीष  रमिल्ला, संदीप गायकवाड,आदित्य शिंगाडे, शुभम बहुरिया, मनीष पोडशेट्टीवार
आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत