Top News

माजी वित्त मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचा मोर्शी वरुड ला मदतीचा हात.

मोर्शी वरुड तालुक्याला ऑक्सिजन काँसंट्रेटर सुपूर्त.

भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांचा पुढाकार.
(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
अमरावती:- कोरोनाच्या तिसऱ्या लाटीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन, कोविड रोगामध्ये अनेक रुग्णांची ऑक्सिजन पातळी अचानक खाली जाऊन तो रुग्ण गंभीर होतो व जर अशा रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास त्या रुग्णाच्या शरीरातील कार्यप्रणालीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाची स्थिती खालावते व अनेक रुग्ण उशिरा वैद्यकीय मदत व ऑक्सिजन मिळाल्याने दगावत आहेत.अशा वेळी रुग्णांना दिलासा म्हणून माजी वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी स्वखर्चातून भाजयुमो प्रदेश सचिव यांच्या मागणीने मोर्शी वरुड तालुक्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.
कोविड रुग्णासाठी वैद्यकीय मदत उपलब्ध होई पर्यंत ऑक्सिजन काँसंट्रेटर फायद्याचे ठरत आहे.त्यामुळे अनेक रुग्ण गंभीर होण्यापासून वाचणार आहेत.ऑक्सिजन काँसंट्रेटर हे नवीन उपकरण असून त्याची मोठ्या प्रमाणात आज मागणी आहे. मोर्शी वरुड विधानसभेत व अमरावती जिल्ह्यात आवश्यकते अनुसार हे उपकरण आपण उपलब्ध करून देणार असल्याचे माजी वित्त मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सांगितले.
सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानी भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांना ऑक्सिजन काँसंट्रेटर सुपूर्त केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे उपस्थित होते.
ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन मिळविणे साठी व कोविड बाबत रुग्णांना मदत मिळवून देणे करीता सोपान कनेरकर मित्र परिवाराशी संपर्क साधण्याचे आवाहन सोपान कनेरकर यांनी केले आहे. लवकरच ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन स्थानिक सेवाभावी संस्थेला दान करू अशी माहिती या वेळी सोपान कनेरकर यांनी दिली.
मोर्शी वरुड येथील कार्यकर्त्यांनी या स्तुत्य कार्याबद्दल माजी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने