Click Here...👇👇👇

जिवती तालुक्यातील भुमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमिन पट्टे द्या. Farmer

Bhairav Diwase
विदर्भ राज्य आंदोलन समितीकडुन पालकमंत्री यांना निवेदन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील महसूल व वन विभाग जमिनीचे नव्याने सर्वे करून भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे देने बाबत सदर निवेदन मा. श्री.विजयभाऊ वडेट्टीवार ( इतर मागास बहुजन कल्याण विभाग खार, जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री, चंद्रपूर म.रा.) यांना सुदामभाऊ राठोड विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांनी निवेदन दिले.


जिवती तालुक्यातील शेतकरी सुमारे 1945 ते 1950 पासून शेतकरी शेतीची मशागत करून आपले उदरनिर्वाह करून आपल्या पाल्याना जगवत आहे,महोदय 50 ते 55 वर्षपेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा आता पर्यंत आम्हाला आमच्या शेतमालकीचे आमच्या हक्काचे जमीनपट्टे मिळालेले नाही, म्हणून आम्ही शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामध्ये शासनाच्या विविध योजनेपासून भूमिहीन शेतकरी वंचित राहत आहे.
कारण जिवती पहाडावर कोणतेच उद्योग नाही मग मंत्री महोदय आम्ही शेतकरी कसे जगायचे व आमच्या मुला बाळाचे भविष्य कसे घडवायचे सांगा आता शिक्षणासाठी सुद्धा सात बाराची अट्ट सरकारनेसुद्धा लादली आहे. म्हणून विद्यार्थी सुद्धा शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ या जिवती तालुक्यातील मुलावर आली आहे म्हणून मंत्री महोदय आपण आपल्या मंत्री मंडळामध्ये हा मुद्दा मांडून कायद्यामध्ये दुरुस्ती करून तीन पिढ्यांची अट रद्द करून सरकारनी आम्हा भूमिहीन शेतकऱ्यांना तात्काळ न्याय मिळवून द्याल ही विनंती. मागणी पूर्ण न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेन. असा इशारा सुदामभाऊ राठोड विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी दिला.