🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची आत्मनिर्भर भारत अभियानाच्या चंद्रपूर जिल्हा संयोजकपदी नियुक्ती. BJP(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती माजी वित्त,नियोजन व वन मंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी सोपान कनेरकर,आत्मनिर्भर भारत अभियान पूर्व विदर्भ संयोजक सारंग कदम,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्याहस्ते नियुक्ती करण्यात आली आहे.
   भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्याक्ष आशिष ताजने २००६ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुळले व २०१० मध्ये त्यांनी प्राथमिक वर्गाचे प्रशिक्षण पूर्ण केले.त्यानंतर २०११ ला भारतीय जनता युवा मोर्चा कोरपना तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती,२०१३ व २०१७ ला भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली,
२०१६मध्ये संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली,तसेच पक्षानी त्यांच्या कार्याची दखल घेत फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूकित त्यांना उमेदवारी दिली त्यामध्ये त्यांनी २९२९ मतदान घेतले परंतु अवघ्या ३५ मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला परंतू त्यानंतरही त्यांनी विकासात्मक कार्य करून जनतेच्या समस्या सोडविण्याचे काम अविरतपणे सुरू आहे, त्यानंतर २०२० मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांचे पक्षाचे संघटनात्मक कार्य अविरतपणे सुरू आहे.त्यांच्याच या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना आत्मनिर्भर भारत अभियानाच्या जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली.
   सदर अभियानाच्या माध्यमातून योजनेचा लाभ जनसामान्यांपर्यत पोहचला पाहिजे व त्यांना लाभ घेत असताना कोणतीही अडचण आल्यास त्याची सोडवूक झाली पाहिजे तसेच योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचला पाहिजे या उद्देशाने सदर नियुक्ती करण्यात आली.
सदर नियुक्ती झाल्याबद्दल माजी वित्त नियोजन व वन मंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,आमदार बंटी भांगडीया,भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनूले,माजी आमदार अँड.संजय धोटे,माजी आमदार अतुल देशकर,माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी नियुक्तीबद्दल अभिनंदन व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत