🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

तक्षशिला नगर बामणवाडा परिसरात वृक्षारोपण. Environment(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- पर्यावरण संरक्षण व निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने बामणवाडा येथे विक्रमशिला बहुउद्देशिय संस्था(र.न.एफ.१२९००)तक्षशिला नगर बामणवाडा यांच्या वतीने तक्षशिला नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण मोहीम हाती घेतली.या मोहिमेत सामाजिक जाणीव ठेवुन विविध उपक्रम राबविण्यात विक्रमशिला बहुउद्देशिय संस्था तक्षशिला नगर बामणवाडा नेहमीच अग्रेसर असते.लाॅकडाऊनच्या काळात प्रवाशांना अल्पोहार देणे,कलावंताना विचारमंच मिळावा म्हणुन राज्यस्तरीय विविध स्पर्धेचे आयोजन करणे,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे अशा विविध उपक्रमात या संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे.वृक्षलागवड मोहीमेत आपलेही योगदान राहावे यासाठी विक्रमशिला बहुउद्देशिय संस्थेनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेवुन तक्षशिला नगर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले..
ग्रामपंचायत बामणवाडाचे सरपंचा भारती पाल, अविनाश टेकाम(उपसरपंच),दत्ताजी कवठाळकर (ग्रामसेवक),प्रफुल चौधरी (सदस्य ग्रा.पं.),भारती करमनकर (सदस्या ग्रा.पं.),राकेश वाघमारे (सदस्य ग्रा.पं.),समिश्रा झाडे (सदस्या ग्रा.पं.) तसेच संस्थेच्या सर्व संचालकानी आपल्या शुभहस्ते सामाजिक सभागृह तक्षशिला नगर बामणवाडा व इतर परिसरात वृक्षारोपण केले.
 कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतुन विक्रमशिला बहुउद्देशिय संस्थेचे सचिव भारत फुलझेले यांनी वृक्षाचे महत्व यावर प्रकाश टाकला.संस्थेचे अध्यक्ष अमरदिप वनकर यांनी वृक्षारोपणा नंतर वृक्षसंवर्धन काळाजी गरज यावर प्रकाश टाकला.संस्थेचे संचालक तथा ग्रा.पं.सदस्य सर्वानंद वाघमारे यांनी वार्डातील नाली बांधकामाचे तसेच डाॅ.आंबेडकर सामाजिक सभागृह या परिसरात ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छतागृह बांधुन देण्याच्या मागणीचे निवेदन सरपंचा भारती पाल यांच्याकडे दिले.या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन सरपंचा भारती पाल यांनी दिले.कार्यक्रमांचे संचालन धनराज दुर्योधन यांनी तर आभार लालचंद वाघमारे यांनी मानले.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवारण कांबळे,गोकुलदास पाटील,मिलिंद ढोणे,विवेक बक्षी,मेघराज उपरे,प्रभाकर खोब्रागडे,सुरेश जीवने,मारोती घागरगुंडे,कर्मविर टिपले,राजु गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत