कोविड काळात घरी राहून वटपौर्णिमा केली साजरी.

Bhairav Diwase
घरीच वडाचे झाड लाऊन केली वीधीवत पूजा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोविड -१९ मुळे संपूर्ण देशात अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले. शाशना मार्फत "घरी रहा सुरक्षित रहा" म्हणत गरज नसतांना घरा बाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. 


त्यामुळे वटपौर्णिमेला घरा बाहेर जाऊन गर्दी करण्यापेक्षा घरातच एका कुंडीत वडाचे झाड लाऊन त्याची वीधीवत पूजा करून आपला सांस्कृतिक वारसा जपत ,आणि कोविड नियमांचे पालन करत शिवाजी नगर वार्डातिल रहवासी अर्चना मंगेश लांडे यांनी वटपौर्णिमा साजरी केली.
बाहेर विनाकारण गर्दी करण्यापेक्षा घरीच राहून आपले सण समारंभ साजरे करून कोरोणाचा संभावित धोका टाळता येतो असे अर्चना लांडे यांचे मत आहे. दोन वर्षापूर्वी त्यांनी घरीच एका कुंडीत वडाचे झाड लावले आणि त्याची निगा राखत वटपौर्णिमेला वीधीवत परिवारातील महिला त्या झाडाची पूजा करतात.