Top News

सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते जी.पी.एफ ला जमा करा.

🆘
म. रा. प्राथमिक शिक्षक संघाने केली मागणी.

काही शिक्षकांचा एकही हप्ता जमा न झाल्याचे वास्तव.

जिवती:- राज्य कर्मचारी सातव्या वेतनाचा लाभ घेत असतांना काही शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या हप्त्यांची थकबाकी अजूनही जी.पी. एफ. ला जमा न झाल्याचे वास्तव पुढे आले असून त्यावर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी म. रा. प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. 🆘
संघटनेच्या समस्या निवारण दौऱ्याअंतर्गत जिल्हाध्यक्ष सुभाष बेरड यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने पंचायत समिती जिवती चे सहाय्यक गटविकास अधिकारी मा. आस्कर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. पंचायत समितीतील बऱ्याच शिक्षकांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या हप्त्यांची थकबाकी जी. पी.एफ.ला जमा झालेली नाही. काही शिक्षकांचा एकही हफ्ता जमा करण्यात आलेला नाही. ही गंभीर बाब संघटनेने प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यावर योग्य उपाययोजना करून प्रकरण त्वरित निकाली काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
                   🆘
        यावेळी संघटनेने विविध समस्यांवर चर्चा केली. सातव्या व सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीची पडताळणी करणे, सेवानिवृत्त शिक्षकांची गटविम्याची प्रकरणे निकली काढणे, शालेय पाठ्यपुस्तके थेट शाळेपर्यत पोचवणे, परीक्षेला बसण्याची परवानगी मिळण्याचे प्रस्ताव त्वरित पाठविणे, शाळा अनुदानांबाबत मुख्याध्यापकांना वेळोवेळी अवगत करणे, जड वस्तू निर्लेखनाबाबत कार्यशाळा घेणे, परिभाषित अंशदान योजनेतील शिक्षकांना १ जुलै ला देय असणारा सातव्या वेतन आयोगाचा हप्ता मिळणे इ. प्रलंबित समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. सर्व समस्यांवर लवकरच उचित उपयोजना करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने संघटनेला दिले आहे. यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी डुंबरे व शिक्षण विभागाचे लिपिक उपस्थित होते. शिष्टमंडळात संघटनेचे सुरेश पानघाटे, वनपाल सोयाम ,श्रीरंग राठोड, शालिक पेंदोर, उमेश लांजेकर हिंगाने ,निलकंठ साळवे आदी पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला.
🆘
अन्यायग्रस्त संबधित शिक्षकांनी वारंवार पं.स.ला भेटी देऊन विनंती करूनही थकीत हप्ते जी.पी.एफ ला जमा झाले नाहीत हे न्यायसंगत नाही. संघटनेच्या मागणी नंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.
सुभाष बेरड जिल्हाध्यक्ष
म.रा.प्राथमिक शिक्षक संघ


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने