Click Here...👇👇👇

नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दालमिया फॉउंडेशन तर्फे आरो फिल्टर भेट.

Bhairav Diwase

रुग्णांना सुद्ध पाणी पिण्याची सोय होणार.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दालमिया भारत फॉउंडेशन तर्फे आरो फिल्टर मशीन भेट देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारंडयाच्या सरपंच सौ.अनुताई ताजने,कार्यक्रमाचे उद्घाटक दालमिया सिमेंट कंपनीचे शाखा प्रबंधक सुनील भुसारी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे,एचआर प्रमुख उमेश कोल्हटकर,सीएसआर प्रमुख प्रशांत भिमनवार डॉ.पाचकवडे,डॉ.दीक्षा ताकसांडे यांची उपस्थिती होती.
नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वी आरो फिल्टर उपलब्ध होते परंतु ते खूप दिवसांपासून खराब अवस्थेत होते त्यामुळे रुग्णांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नव्हती त्यामुळे रुग्णांची पिण्याच्या पाण्यासंदर्भात गैरसोय होत होती या प्रकरणाची दखल घेत नारंडा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांनी दखल घेत दालमिया भारत फॉउंडेशनकडे आरो फिल्टर नवीन बसविण्याबाबत मागणी केली त्यांच्या मागणीची दखल घेत दलमिया भारत फॉउंडेशन तर्फे नवीन आरो फिल्टर बसविण्यात आले.त्यामुळे आता प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणार आहे.
यावेळी नारंडा ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे,आरोग्य सेविका पंचशीला मेश्राम,लक्ष्मण कुडमेथे,गौरव वांढरे उपस्थित होते.