Top News

तंटामुक्त समितीने लावला प्रेमीयुगुलांचा विवाह.



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने प्रेमी युगुल विवाह बंधनात अडकण्याची घटना दि.१९ जून रोजी भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे घडली.

मूल तालुक्यातील येरगांव येथील युवक आकाश पेंदाम आणि मुधोली येथील एक युवक हे शिकत असताना एकाच वसतीगृहात राहत होते. त्यामुळे त्या दोघांची मैत्री झाली. मित्रासोबत आकाश नेहमी मुधोलीला यायचा. त्यामुळे त्या मित्राची चुलत बहीण मगज्योती हीच्यासोबत ओळख झाली. हळूहळू ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरविले. हे लग्न रितीरिवाजानुसार लाऊन देण्यास दोघांच्याही कुटुंबातील मंडळी तयार झाली. परंतू अचानक कुटुंबातील मंडळींनी आपली भूमिका बदलल्याने 'त्या' प्रेमी युगुलांसमोर पेच निर्माण झाला.युवकाने लगेच मुधोली गाठली व तेथील काही सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेऊन लग्न लाऊन देण्याची विनंती केली.ही गोष्ट तंटामुक्त समितीच्या सदस्यांना कळताच त्यांनी युवक व युवतींच्या आई-वडीलांना समजावून लग्नसमारंभाला येण्याची विनंती केली.त्यानुसार दोघांकडचेही आई-वडील आले. ग्रामपंचायत मुधोलीच्या सभागृहात या प्रेमी युगुलांचा मुधोलीवासियांच्या साक्षीने विवाह पार पडला.
यावेळी सरपंच बंडू पाटील नन्नावरे, उपसरपंच वैशाली सिडाम,ग्राम.पं.स.यशवंत गायकवाड, वर्षा रंदये,मोनाली घरत, तटांमुक्त समितीचे हनुमान राणे, सुरेश दडमल, नाना गजभे रुपेश चौधरी,विलास मूरकुटे, जितेद्र पेंदाम, मुलीचे मोठे वडील पांडुरग सिडाम, दुर्योधन गेडाम, शंकर गेडाम,विनोद मडावी, मुलीची आई रामकला सिडाम,मुलीचे भाऊ धर्मा सिडाम, मुलाचे वडील लालशाम शाह व आई आम्रपाली पेंदाम उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने